Posts

कोरोना वाढला; राज्यातील २५ कोविड रुग्णालये पुन्हा सुरू केली.

Image
 कोरोना वाढला; राज्यातील २५ कोविड रुग्णालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाची २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी बुधवारी संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. आश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावावा, तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्वांनी मास्क लावून काम करावे, असे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. महाजन म्हणाले की, सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 5 हजारांहून अधिक कोविड खाटा आहेत. तर 2 हजारांहून अधिक ...

आत्मविश्वास कसा मिळवायचा ?

 आत्मविश्वास कसा मिळवायचा हे आपण पायरी पायरीने समजून घेऊ. आत्मविश्वास का गमावतो याची कारण आपण समजून घेऊ. कित्येक जणांमध्ये आत्मविश्वासाच्या अभावाचं एक मुख्य कारण आढळतं ते म्हणजे, स्वतःला कमी समजणं. ज्या लोकांनी स्वतःला पूर्णपणे स्वीकारलेलं नसतं त्यांच्यांमध्ये कमीपणाची भावना तयार होते. त्यासाठी स्वतःला स्वीकारायला हवं. "पण स्वतःला स्वीकारायचं म्हणजे काय ?" तुम्ही जसे आहात, जेवढं तुमचं शिक्षण आहे, तुमच्या घरातील आजूबाजूचे लोक जसे आहेत, तुमच्यात जे गुण आहेत, तुम्ही जसे दिसता या सर्वांचा आहे तसा स्वीकार करणं. पण कित्येकांना याचा पूर्णपणे स्वीकार करताच येत नाही. नाशिकमधील कार्यशाळेमध्ये मी समोर बसलेल्या पार्टिसिपन्टस्ना हा प्रश्न विचारला होता, की "या क्षणी तुम्ही आत्ता जसे आहात तसे तुम्हाला मुंबईतल्या सर्वांत उच्च अशा हॉटेलमध्ये पाठवलं. तिथे सिनेसृष्टीतील मोठमोठ्या नट-नट्या पार्टीसाठी हजर आहेत. तुम्ही त्या पार्टीत आत्ता गेलात तर किती आत्मविश्वासाने वावरू शकाल? ज्या आत्मविश्वासाने तुम्ही इथे वावरता, तुम्ही तुमच्या घरी वावरता, तुमच्या कामाच्या ठिकाणी वावरता तितकाच आत्मविश्वास ...

मनसेच्या ‘या’ नेत्यानं दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा, सोडचिठ्ठीनंतर जिल्ह्यात एकच चर्चा हर्षदा शिनकर

Image
 मनसेत खळबळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष यांचा राजीनामा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी राजीनामा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यावरुन मनसेत एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. राजीनामा दिल्यानंतर काही क्षणातच दिलीप दातीर यांच्या राजीनाम्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दिलीप दातीर यांनी 2019 मध्ये पश्चिम विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदारकीचे तिकीट नाकारल्याने दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर दिलीप दातीर यांच्यावर नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून मनसेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर दिलीप दातीर यांच्याकडे शहाराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आज त्यांनी त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला असून तो मंजूर करावा म्हणून विनंती केली आहे. तर दिलीप दातीर यांनी राजीनाम्या देण्यामागील कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे.